Wednesday, January 21, 2015

धन जोडावे उत्तम व्यवहारे

धन जोडावे उत्तम व्यवहारे
   अर्थसाक्षरता वाढावी आणि अधिकाधिक लोक संपत्ती निर्मितीकडे वळावेत यासाठी वेगवेगळया पातळयांवर गेल्या काही वर्षांत सामूहिक आणि संस्थांत्मक पातळीवर प्रयत्न होत आहेत. विशेषत: स्टॉक मार्केट म्हणजेच शेअर बाजारातले व्यवहार  सर्वसामान्यांना करता येणं शक्य व्हावं यासाठी हे प्रयत्न आहेत.
   गुंतवणुकीच्या पारंपरिक पध्दतीच्या पलिकडं बघणं सध्याच्या काळात आवश्यक आहे. महागाईचा वाढता दर आणि बचत खात्यांवर मिळणारा व्याजाचा दर यात बरीच तफावत आहे. त्यामुळे गुंतवलेल्या रुपयांचं मूल्य मुदतीनंतर हे कमी झालं असतं.
   विमा योजनांना गुंतवणुकीचे साधन समजलं जाण्याकडे कल आहे. पोस्टातल्या ठेवी, बँकेतल्या फिक्स डिपॉझिट्स सारख्या सुरक्षित ठेविंकडेच बहुतेकांचा कल असतो. यात सुरक्षितता असली तरी वृध्दी मात्र साध्य होत नाही. शेअर मार्केट आणि म्युच्यूअल फंडातील दीर्घकालीन  गुंतवणुकी चांगले उत्पन्न देतात असं दिसून आलं आहे. या गुंतवणुकीमध्ये अधिक धोका असला तरी मिळकतही तशीच मोठी राहू शकते.मात्र या सर्व बाबींचा सातत्यानं अभ्यास आणि सराव आवश्यक ठरतो.
   असा अभ्यासकरण्याची सोय बॉम्बे स्टॉक एक्सेंज इन्स्टिट्यूटने केली आहे. या संस्थेने शेअर बाजार आणि म्युच्यूएल फंडातील गुंतवणीबाबत विविध अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालवले जातात . हे अभ्यासक्रम दोन दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत कालावधीचे आहेत. या अभ्यासक्रमानंतर या गुंतवणीबाबत प्राथमिक माहिती मिळून बऱ्याच शंका दूर होण्यासाठी सहाय्य होतं. शिवाय हळू हळू करियर वा व्यवसाय करण्यासाठीही हे ज्ञान उपयुक्त ठरु शकतं. सात्यतपूर्ण व्यवहरातून अधिक तज्ज्ञता कौशल्य प्राप्त होऊ शकतं. त्याद्वारे व्यवसायची साखळी अधिक सक्षम करता येऊ शकते.
   हे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत- 1)बेसिक कोर्स ऑन स्टॉक मार्केट-या अभ्यासक्रमाचा कालावधी चार दिवसांचा आहे.कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण हा अभ्यासक्रम करु शकतो.शिवाय स्टॉक ब्रोकर,सबब्रोकर,आणि कोणताही गुंतवणुकदार हा अभ्यासक्रम करु शकतो. 2)ऍ़डव्हान्स्ड कोर्स ऑन स्टॉक मार्केट.या अभ्यासक्रमाचा कालावधी आठ दिवस आहे.3)फायनान्शिअल स्टेटमेंट ऍ़नालिसीस-कालावधी एक दिवस.4)हाऊ टू रिड म्युच्यूअल फंड फॅक्ट्स शीट. 5)सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन स्टॉक मार्केट, 6)फंडामेंटल्स ऑफ म्युच्यूअल फंड कालावधी- दोन दिवस, 7)कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रॅम ऑन इक्विटी रिसर्च,कालावधी- सहा दिवस, 8)सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट- कालावधी दहा आठवडे,अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, 9)सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन टेक्निकल ऍ़नालिसीस,कालावधी- पाच आठवडे, 10)इंटरनॅशनल सर्टिफिकेट इन वेल्थ ऍ़ण्ड इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट,कालावधी- दहा आठवडे, 11)सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन रिस्क मॅनेजमेंट, ,
   संपर्क-बीएसई इन्स्टिट्यूट लिमिटेड 18 आणि 19 वा माळा,पी.जे.टॉवर्स,दलाल स्ट्रीट,मुंबई,-400001,ईमेल-admissions@bseindia.com/ training@bseindia.com ,वेबसाइट- www.bsebti.com, दूरध्वनी ज्ञ् 22728856
   000


No comments:

Post a Comment