Wednesday, October 16, 2013

सचीन प्राजींसाठी बहुमोल सल्ले

सचीन प्राजींसाठी बहुमोल सल्ले
    सचीन तेंडुलकर यांनी निवृत्ती घेतली.आता त्यांनी काय करावं?हा सवाल समस्त जगाला पडला. त्यांनी काही तरी केले पाहिजेच नाही तर त्यांचे काही खरे नाही,असा त्यामागचा सदहेतू. कलियुगातच असं घडू शकतं.ते निवृत्त होत नव्हते तर ही मंडळी देव पाण्यात बुडवून ठेवत होती.त्यांनी आता निवृत्ती घेतली तर म्हणे ते क्रिकेटची जान होते.आता ही जानच गेली.म्हणजे याचा अर्थ त्यांनी निवृत्ती घ्यायला नको होती का? बरे आता त्यांनी निवृत्ती घेतली तर लगेच त्यांच्या भविष्याविषयीची घनदाट चिंता. जणू काही आता त्यांना दोन्ही वेळेच्या जेवणाचीही भ्रांत. त्यामुळे मग त्यांनी हे करावे ते करावे,असे सल्ले लगेच सुरुही झाले. आम्हासही असं वाटलं की आपणच कां बुवा मागे राहायचे. शिवाय सल्ले द्यायला डॉलर्स/येन/युरो खर्च करावे लागत नाहीत.ज्याच्यासाठी सल्ला असतो त्याने तो ऐकलाच पाहिजे,मानलाच पाहिजे असे कोणतेही घटनात्मक बंधन नाही.असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही बाजुला असताना आम्ही मागे राहणं शक्यच नव्हतं त्यामुळे मग आम्ही सुध्दा काही सल्ले देऊनच टाकले.त्यातले निवडक सल्ले इथे पेश करत आहोत.
    1)सचीन्स रेसिपी-सचीन प्राजी हे उत्तम खवैय्ये आहेत.जगातील ज्या ज्या शहरात ते गेले,त्याठिकाणची स्पेशल डिशची चव त्यांनी चाखली.त्यांनी जेव्हा मुंबईत हॉटेल सुरु केले तेव्हा त्यासाठी असंख्य रेसिपी गोळा सुध्दा केल्या. त्यावर आधारित त्यांनी एक पुस्तकच काढावे.सचीन यांना क्रिकेटच्या मैदानावरुन अवघ्या 25 वर्षात निवृत्ती घ्यावी लागली मात्र सचीन्स रेसिपी हे पुस्तक किचनच्या मैदानावर 100 वर्षं खेळतच राहील.
    2) प्यार का फंडा-आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आणि शिक्षणाने त्याहून मोठ्या कन्येच्या प्रेमात कसं पडायचं  किंवा  त्या कन्येला प्रेमात कसं पाडावं,यासाठी कशी बॅटिंग करावी आणि चेंडू ऑफसाइडला जास्त टोलावायचे की ऑनसाइडला अधिक टोलावाचे हे सचीन प्राजी शिवाय कोण बरं ऍ़क्युरेट सांगू शकेल.त्यामुळे त्यांनी आता,प्यार का फंडा हे ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण सुरु करायला करायला हरकत नाही.
    3 )रात के दो बजकर दो मिनट-गेली 24 वर्षं सचीन प्राजी हे लहान मोठ्या क्रिकेटपटूसोबत जगभरातील विविध शहरांमध्ये क्रिकेटच्या ड्रेसिंग रुममध्ये होते.हे खेळाडू मैदानावर वेगळा खेळ करतात आणि ड्रेसिंगरुमध्ये दुसरा खेळ करतात.रात के दो बजे तर हा खेळ मस्तच रंगत असला पाहिजे ना! सचीन प्राजी शिवाय हे कोण बरे सांगू शकेल.शिरीष कणेकरांच्या मदतीने त्यांनी हा एकपात्री प्रयोग सुरु केला पाहिजे.तो सुपर-ड्युपर हिट होईल यात आम्हास मुळीसुध्दा शंका नाही.
    4) ते आणि त्यांच्या प्रेमिका- गेल्या 24 वर्षात सचीन प्राजी अनेक क्रिकेटपटूंच्या प्रेमप्रकरणांचा साक्षिदार राहिले आहेत.याप्रेमप्रकणांवर आधारित महा-कादंबरी तो युवँ लिहू शकतात.त्यासाठी त्यांना घोस्ट रायटर हवे असतील तर ते मराठीत ढिगाने आहेत.त्यांनी  जस्ट हिंट देण्याचीच देरी..घोस्ट रायटरांची फौज त्यांच्या समोर हजर.
    5)विनोद कांबळीचं नेमकं चुकलं कुठं?-या विषयावर थोडा अभ्यास आणि खूप सारे पुरावे गोळा करुन सचीन प्राजी मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट करु शकतो.हाच प्रबंध पुढे डी.लिट म्हणूनही स्वीकाराला जावू शकतो.
    6)व्टेंटी-व्टेंटी एक वास्तव आणि विस्तव- ही महाचर्चा सचीन प्राजी कोणत्याही दूरचित्रवाणीवर घडवून आणू शकतात.या महाचर्चेला सर्वाधिक टीआरपी आणि पर्यायाने जाहिराती मिळून त्यांचा बँकबॅलन्स शतगुणित होऊ शकतो.
    7)मी आणि माझे कॅप्टन्स,माझ्या 10 नंबरच्या शर्टाचे रहस्य,हरभजन अँग्री यंग मॅन की अँग्री मॅड मॅन,इफ आय ऍ़म गॉड देन व्हॉट अबाऊट तिरुपती बालाजी?अशा सारख्या पुस्तकांची मालिका सचीन प्राजी घोषित करु शकतात.त्यासाठी त्यांना मानधन म्हणून कोट्यवधी रुपये कोणताही प्रकाशक देऊ करेल.


No comments:

Post a Comment