Saturday, January 12, 2013

2012 विचार आणि अविचार


2012 विचार आणि अविचार
  
   जुनं वर्षं सरलं.
   या वर्षांचं सिंहावलोकन केलं तर अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसतात.आता हेच बघा ना.
   दबंग टू,हा सिनेमा तीन दिवसात 68 कोटी रुपये कमवतो,पाचव्या दिवशी 100 कोटित जाऊन बसतो.दबंग वनची पुढची पण सो सो अशी आवृत्ती असणाऱ्या या फिल्मवर कां बरे लोकांच्या उड्या पडल्या असतील.विचारी अभिनेता अशी ख्याती असलेल्या अमिरखान यांचा तलाश नामक विचारी सिनेमा हा 15 व्या दिवशी रडत कुथत 68 कोटीत बसला. आपल्या देशात विचारीपेक्षा अविचारींची संख्या वाढली असे समजावे काय...
   000
   याच वर्षांत बोल बच्चन,नामे एका अविचारी चित्रपटालाही 100 कोटीचा सुवर्ण स्पर्श झाल्याची चर्चा रंगली.या चित्रपटाच्या नावाशी साधर्म्य असणारा झोल बच्चन,नामे मराठी नाटक वर्षं संपता संपता रंगमंची आले.मराठी माणसाच्या विचाराची उडी फक्त बो वरुन झो वरच जाते हे सिध्द करण्यासाठी हे नाटक पुरेसे समजावे की काय..
   000
   जोकर नामक अविचारी (मायनस )असणारी फिल्म 20 कोटीचा धंदा करती झाली.तरी ती म्हणे सुपर फ्लॉप.मराठी सुपर हिट-काकस्पर्श.उत्पन्न चार,साडे चार फार तर पाच कोटी.तुकाराम अडकले दीड-दोन कोटीतच.मराठी रसिकांनी किती विचार केला असावा नाही का,हे चित्रपट बघायचे की नाही बघायचे..विचार झाला पण कृती करण्याची वेळ तर चित्रपट थिएटर बाहेर.
   000
   किलोने पुस्तक विकण्याचा एक्स्ट्राआर्डनरी अविचार मार्केटिंगचा सुपर फंडा म्हणून गाजला. गवाराच्या भाजीपेक्षाही पुस्तकं स्वस्त झाली. भाजी मंडईत पुस्तकाचा ठेला ठेवण्याचा विचार कोण्या बुध्दिमंतास सुचतो का,ते 2013 मध्ये बघू या..
   000
   मल्लिका शेरावत यांनी 31 डिसेंबरला इंडियात होणाऱ्या पाटर्यांमध्ये नाचायचा अविचार करणं जमणार नाही असं जाहीर केलं. कारण हॉलिवूडमध्ये 31 डिसेंबरला नाचायचा विचार त्यांना शिवला म्हणे.धन्य.
   000
   शाहरुख खान यांचं यंदाचं गाजलेलं वाक्य,मला रात्री फार झोप येत नाही.मी अलमोस्ट जागाच असतो.(अरे शाहरुख बाबा,सल्लू भायचा फार विचार करतोस की पिगी चॉप्सचा.दोन्ही विचार हे खोल खोल विहिरीत पाडणारेच.)
   000
   मराठी बाणाकारांचा विचार,महाराष्ट्राची खंत -राखी सावंत.शोभा डे यांचा विचार,-राखी सावंत मे ग्रेट बिझिनेस मॅनेजमेंट पोटेन्शिल है यार.सो शी इज सक्सेसफूल.तिची दखल तर घ्यावीच लागेल बॉस..(हा विचार की अविचार..)
   000
   सचिन तेंडुलकरांना म्हणे संदीप पाटील यांनी इंडायरेक्टली सजेस्ट केलं होतं की,यू मे ड्रॉप फ्राम वन डे स्क्वॉड ..त्यामुळे त्यांनी रिटायमेंटचा विचार केला..(संदीप पाटील साहेबांनी खरोखरच असं सजेस्ट केलं असेल,तर हा त्यांचा मास्टर स्ट्रोकच म्हणायचा,असा आपण अविचार करु या का.)
00
   कधी काळी ओम पुरी यांनी अर्ध सत्य सांगितलं होतं.2012 साली शेर्लिन चोप्रा यांनी,प्ले बॉय मार्फत पूर्ण (नग्न)सत्य दाखवले. त्यामुळे आता पुढे काय,या विचारमंथनात श्रीमती पूनम पांडे गढून गेल्या आहेत..म्हणे..
   000
   कमाल धमाल मालामाल,याचित्रपटात,नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका होती.या चित्रपटांचे डिफॅक्टो डायरेक्शन नाना पाटेकर यांनीच केले होते म्हणे.हा चित्रपट पहिल्या दिवशी लागला.तिसऱ्या दिवशी झोपला..या चित्रपटाचे सर्वेसर्वा प्रियदर्शन यांना नाना अजुनही तिकिट बारीवर चालतो हा विचार कोणत्या रम्य प्रहरी पडला असावा बरे..
   000
   आपण अजुनही शेन वॉर्नच्या प्रेमात कां बरे असा एक दुष्ट विचार अधून मधून भारताच्या माजी सूनबाई एलिझाबेथ हर्ली यांच्या मनी येतो म्हणे.
   000
   अमेरिकेच्या मस्त विचारसरणीतून यंदा नवा पुरस्कार निघालाय- बेस्ट रिव्हेंज ब्युटी..हा पुरस्कार मिळालाय केटी होम हिला. कारण आपल्या सल्लूभायपेक्षा 500 पट लोकप्रिय आणि मानधन घेणाऱ्या टॉम क्रुज या  आपल्या नवऱ्यापासून  तिने फारकत घेतली. महासूपरस्टॉरची बायको म्हणून जगभर मिरवल्यावरही फारकत घेण्याचं टेन्शन तिनं तिच्या बॉडी-शॉडीवर पडू दिलं नाही.आणि फारकत घेतल्यानंतरही ती मिसेस टॉम क्रुज असताना जशी सेक्सी दिसत तशीच कुमारी केटी होम्सच्या रुपात आल्यावरही तश्शीच किंबहुना त्याही पेक्षा अधिक दिसत होती.शिवाय डोळयात अंगार..बदले की आग..म्हणून बेस्ट रिव्हेंज ब्युटी..
   000
   आपल्या अजय अतुल यांना हिंदी सिनेमातला पहिला ब्रेक राम गोपाल वर्मा यांनी दिला होता. चित्रपट होता- गायप.अजय अतुल यांची  विश्वविनायक ही कॅसेट ऐकून ते प्रभावित झाले.ते म्हणाले,मै भगवान पे विश्वास नही रखता,लेकीन विश्व विनायक सुनने के बाद मुझे लगता है भगवान पे विश्वास रखना जरुरी है.(रामूजी,भगवानवर विश्वास ठेवण्याचा विचार सध्या बाजूला ठेवा,आणि स्वत:वरच विश्वास ठेवण्याचा विचार करा.. भूत रिटर्न ला चार माणसही जमू शकली नाही हो.स्वत:वरचा विश्वास गेला की मग भूतही कामाला येत नाही..)
00
सन्नी लिऑन या एकता कपूर यांच्या एका पार्टित मधुबाला ड्रेस मध्ये गेल्या,त्यांना बघून एकता कपूर विचारमग्न झाल्या.वन्स ऍ़पान टाइम सन्नी लिऑन,असा एखादा चित्रपट काढण्याचा विचार किंवा अविचार त्यांनी करु नये म्हणजे मिळवलं..
000
हॅप्पी न्यू इअर

No comments:

Post a Comment