Sunday, January 6, 2013

पुरुष मित्रांनो,सावध व्हा..!


पुरुष मित्रांनो,सावध व्हा..!
    पुरुष मित्रांनो,सावध व्हा.तुम्ही अक्षयराव असा,शाखरुखराव असा,रणबीरराव असा,सलमान राव असा की श्रीरामराव असा,तुम्ही सावधच व्हा.
    तुम्ही स्वत:ला इंटेलिजंट,स्मार्ट समजत असाल तरीही सावध व्हाच.
    विशेषत:लफडा-सदनात प्रवेश करण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करा आणि मगच त्यात पहिलंपाऊल टाका.
    लफडा-सदनातला प्रवेश कुण्णालाही कळू शकणार,इतका स्मार्टनेस किंवा हुषारी आपल्यात असल्याचा अभिमान तुम्हाला असेल तरी सुध्दा सावध व्हाच.कारण एक (दुष्ट)संशोधन नुकतच बाहेर पडलय हो.
    हे संशोधन करण्याची दुर्बध्दी आपल्यापैकी एका पुरुष मित्राला झालीय.हे संशोधक आहेत लफडा सदनात मोठ्या डौलात आणि थाटात सदैव प्रवेश करणाऱ्या शेन वार्न-भाऊ याच्या मातृभूमितील-ऑस्ट्रेलियातील.लैग सॉयमन्स हे ते थोर संशोधक .त्यांचं संशोधन रॉयल सोसायटी जर्नल बायलॉजी लेटर्स,या नियतकालिकात नुकतच प्रकाशित झालय.
    सायमन्स रावांचं संशोधन असं सांगतं की,पुरुषराव आपली प्रेमप्रकरण आणि प्रेमपात्र लपविण्यात स्वत:ला स्मार्ट समजत असेल आणि आपल्या अशा प्रकारणांचा गंध वा सुगंध कुण्णालाच अगदी स्वत:च्या सौभग्यवतीलाही येणार नाही असंही समजत असेल तर ते मुर्खाचा नंदनवनातले रहिवाशी समजायला हवेत. कारण प्रत्येक महिला ही किमान असल्या गंध  वा सुगंधाला ओळखण्याचं स्मार्टनेस घेऊनच जन्माला आलेली असते.त्यामुळे पुरुष मित्रांनो सावध व्हाच.
    पुरुष मित्रांनो,तुम्हाला जरी वाटत असेल ,की तुम्ही शंभर टक्के सुरक्षिततेचं कवच बांधलय, प्रेम प्रकरण लपवायला.तरी तुमच्या चेहऱ्यावर म्हणे ते दिसूनच येतं.तुमचा चेहरा सपाट असला,डोळयात कोणतेच भाव नसल्याचा आव असला तरी,स्मार्ट महिलांना मात्र तुम्ही लफडा-सदनाचं दार ठोठवल्याचं बरोबर समजतं.कळतं.समजा तुमची सौभाग्यवती कधीच या बाबतीत बोलली नसेल,तिने किंचितही शंका उपस्थित केली नसेल,याचा अर्थ तिला काहीच समजलेलं नाही नसून या आनंदात प्रेम प्रकरणातील पुढची प्रकरणं लिहायला मोकळं असं तुम्ही समजू नका.तसं समजून अशी प्रकरणं लिहू शकायला तुम्हाला कुणी अडवणार नाही म्हणाच.पण पुरुष मित्रांनो,तुमच्या  सौभाग्यवतींना,तुमचं प्रेमकथा लेखन हे केवळ चारोळी पुरतं मर्यादित राहिलं नसून ते कथा-दीर्घ कथेचा टप्पा ओलांडून कादंबरी लेखनाच्या दिशेने चाललय हे कळलय हे लक्षात असू द्या,म्हणून तुम्ही सावध व्हाच
    पुरुष मित्रांनो, तुम्हाला गुपचूप-चूपचूप प्रेम काव्याचा आस्वाद घेता येऊ नये याची खबरदारी देवानेच घेतलीय.त्यामुळे पुरुष मित्रांनो तुमचा स्मार्टनेस कुचकामाचा ठरलाय.या बाबत देवाने आपल्यापेक्षा महिलांना अधिक स्मार्ट ,इंटेलिजंट बनवलेय हो.या जखमेवर सायमन्सरावांच्या संशोधनातील मीठ चोळल्या गेल्याचं दु: तुम्ही सहनही केलं असतं,पुरुष मित्रांनो.पण प्रत्येक नाटकात जसे व्टीस्ट आणि टर्न्स असतात तसच या संशोधनात जे व्टीस्ट आणि टर्न्स आढळून आलेत,ते तर पुरुषी अहंकाराला झोपवणारेच निघालेय.
    पुरुष मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरुन,तुमच्या डोळयातील भावातून, रुंद खांद्यातून तुम्ही प्रेम प्रवासाची तिकिट कापल्याचे ओळखू शकणारी तुमची सौभाग्यवती,ही जर तुमच्या सारखाच  गंध आणि सुगंधचा आस्वाद घेत असेल ,ते तुम्हाला कळणं कठिण.कारण पुरुष मित्रांनो तुम्ही या बाबतीत स्मार्ट,हुषार आणि बुध्दीमान नाहीत.असं सायमान्सरावांचं संशोधन सांगतं.याचा अर्थ असाच की तुम्ही तसेही स्मार्ट नाहीस नि असेही स्मार्ट नाहीस.कदाचित यालाच इकडे आड तिकडे विहीर तर म्हणत असावे.
    पुरुष मित्रांनो तुम्ही सावधच व्हा ,कारण सायमन्सरावांच्या संशोधनानं एक  अग्निबाणही उडवलाय.सायमन्सरावांची सूचना अशी आहे की,लग्नापूर्वी पुरुष मित्रांनी लफडा सदनात प्रवेश केला किंवा कसे हे लग्नइच्छूक महिलांनी आधीच समजून घ्यावे. त्यासाठी काही महिलांना समजून देण्याचे स्पेशलाईज्ड प्रशिक्षण द्यावे.म्हणजे अशा प्रशिक्षित महिला ठिकठिकाणी सर्विस सेंटर उघडतील.अशा सेंटर्समध्ये लग्नाची गाठ फायनल करण्यापूर्वी  होण्याऱ्या बायकोस घेऊन जायचं.या सेंटरची प्रशिक्षित संचालिका मग तुमच्या कडे टक लावून बघेल .रुद खांद्याकडे बघेल, चेहऱ्याकडे बघेल, डोळयात बघेल आणि आपला रिपोर्ट देईल.संभाव्य बायको समोरच,ती प्रशिक्षित संचालिका,तुमचं त्या क्षणी सुरु असलेली किंवा त्या क्षणाआधी संपून गेलली प्रेमकथा किंवा कविता बायोकडे उघडं करेल.अशा अनफेथफूल माणसाशी लग्न करायचं की नाही तुझ तूच ठरव किंवा मग फाट्यावरच मार त्यास असंही ती प्रशिक्षित संचालिका सांगू शकेल.
    पुरुष मित्रांनो,हे असेच घडेल असं नाही,पण सायमन्सरावांच्या संशोधनातून बाहेर पडलेला हा गांडूळ हळू हळू सरपटत भारत देशी किंवा इतर देशी कधीतरी जाण्याचा धोका आहेच.पुरुष मित्रांनो ,ते जेव्हा केव्हा घडेल तेव्हा घडेल,पण सध्या तरी तुम्ही सावध व्हाच.तुम्ही  स्वत:ला धर्मेन्द्रराव,देवानंदराव,अक्षयराव,जॉनराव,अमिरराव किंवा जेम्स बाँड समजत असलास तरी तरी लफडा-सदनातील प्रवेशाचं सिक्रेट तसच राहू देण्याची क्षमता आणि बुध्दी तुमच्यात नाही रे बाबा..त्यामुळे सावध व्हाच.हॅप्पी न्यू इअर..

No comments:

Post a Comment