Sunday, March 4, 2012

ओबामांचा पॉवरफूल हनुमान

ओबामांचा पॉवरफूल हनुमान
   अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामा या दोघांपैकी डेमॉक्रॅटिक पक्षातील कोण उमेदवार राहील हे ठरविण्यासाठी अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी घनघोर महासंग्राम झाला. या महासंग्रामाच्या अखेरीस ओबामा यांचा विजय झाला.त्यांच्या विजयासाठी अनेक कारणांचा हात आणि भार लागला.अमेरिकन नागरिकांना त्यांच्या बोलण्याची ,त्यांच्या चालण्याची,त्यांच्या बियर पिण्याची ,त्यांच्या सिगार पिण्याची आणि बदल उज्वल भविष्यासाठी या त्यांच्या भाषेची मोहिनी पडली आणि यशश्रीने त्यांच्या गळात माळ टाकली.पण यासोबतच ओबामा यांच्या गळ्यात यशश्रीची माळ पडण्यासाठी हिंदुस्थानच्या श्रीराम भक्त हनुमानजींचा हातभार लागल्याचं आता सिध्द झालं आहे.
   000
   राष्ट्रपतीपदासाठी लढल्या गेलेल्या महासंग्रामाच्या संपूर्ण काळात ओबामा यांनी आपल्या ह्रदयाजवळ हनुमानजींची प्रतिमा ठेवली होती ,अशी एक उघडी झालेली गुप्त माहिती आमच्या हाती आली आहे.निवडणूक प्रचाराला निघण्यापूर्वी ओबामा हे ह्रदयाजवळील हनुमाजींच्या प्रतिमेला आधी वंदन करायचे आणि मगच घराचा उंबरठा ओलांडून निवडणूक रथात बसायचे असेही गुप्त माहितीद्वारे कळलं आहे. हनुमानजींवरील या अपार पण अमेरिकनांसाठी अपरांपरिक अशा भक्तीमुळे आपल्याला शक्ती आणि युक्ती दोन्ही प्राप्त झाल्याचे नंतर ओबामा यांनी हळूच मिशेल वहिनींच्या कानात सांगितल्याचेही आम्हाला कळलं आहे.मिशेल वहिनींनी ही गंमतच वाटली.त्यामुळे त्या गमिगमितीत बिल क्लिंटन भाऊजींच्या जवळ बोलून गेल्या.तेही मग गमतीगमतित हिलरी वहिनींना बोलून गेले.मग या गंमतगोष्टीची बरीच चर्चा इकडे तिकडे होत राहिली..त्याचा हा गोषवारा..
   000
   स्वर्गात आनंदोत्सव आणि तक्रारसुध्दा
   जगावर अनधिकृतपणे कां होईना राज्य करण्याची संधी ज्या ओबामा साहेबांना मिळाली, त्यासाठी आपला हनुमान कारणीभूत ठरल्याचे समजून स्वर्गात फार मोठा आनंदोत्सव मनवला गेला.
   आपल्यापैकी एकाचीही प्रतिमा ह्रदयाजवळ ठेवता ओबामांनी हनुमानाला कां जवळ केले असेल या सवाल प्रत्येक श्रध्देय देवाला पडला.हनुमान आपल्यापेक्षा ज्युनिअर असून सुध्दा त्याचे असे पॉवरफुल होणे अनेक देवांना पसंत पडले नाही.त्यामुळे काही देवांनी देवांचे महासम्राट इंद्र यांच्याकडे तक्रारही केली.महासम्राट इंद्राने त्यांना समजावले की--
   आता अशा तक्रारी करण्यात काही अर्थ उरला नाही देवांनो.काळ आपल्या पुढे निघून गेलाय आपण मात्र तिथल्या तिथेच आहोत.पुढे सरकायला तयार नाही.त्यामुळे आपल्याला असं वाईट वाटतं.आपण देव असून सुध्दा आपल्याला मनाचा मोठेपणा वाढवता येणार की नाही..
    हे बघा देवा,तत्वज्ञानाची सगळी सूत्र आम्हाला पाठ आहेत.पण तत्वज्ञान पाजळण्याची ही वेळ नाही.आपण सावध झालो नाही तर आपणावर अरिष्ट आल्याशिवाय राहणार नाही.देव मंडळी बोलले.
   कसले अरिष्ट.इंद्राने भयभित होत विचारले
   इंद्रा,पूर्वी आपल्या देवलोकाचा स्वामी होण्यासाठी राक्षसगण प्रयत्न करीत.अनेकदा ते यशस्वीही झाले होते.तुम्हाला गादी सोडून पलायन करावे लागले होते.
   तो काळ आता अंतराळात निघून गेला आहे.
       पण आता हे नवे संकट अधिक गंभीर आहे.
   माझ्या काही लक्षात येत नाही.इंद्र म्हणाला
   देवा,हनुमानाची पॉवर लक्षात घ्या.हनुमान तुम्हा आम्हाला ज्यूनियर असून सुध्दा तो पॉवरफूल होत चाललाय याची तुम्हाला काहीच चिंता वाटत नाही का.
   चिंता कशासाठी वाटून घ्यायची.तो आपला सहकारी आहे.तो जर यशस्वी होत असेल तर आपल्या पोटात दुखण्याची आवश्यकता नाही.पोटात दुखले तर पूर्वी फक्त पाला पाचोळयाची औषध घ्यावे लागायचे आता तशी परिस्थिती नाही.टॅबलेट खावो दर्द भगावो अशी आज  स्थिती हनुमान भक्त मानवाच्या कृपेने आली आहे.
   देवा,जरा गंभीर व्हा.हा काही विनोदाचा भाग नाही.
   यात कसला आला आहे विनोद
   देवा,हनुमान आज पृथ्वीतलावर पॉवरफुल होत आहे.त्याचा पॉवर असाच वाढत राहिला तर उद्या तो स्वर्गलोकाला भारी पडेल.तुमच्या राज सिंहासनावर गदा येईल.
   म्हणजे तो माझी गादी बळकावेल असं वाटतं की काय त्ुम्हाला.
   तेच तर सांगायला आम्ही आलो होतो महाराज.
   खरच हे काही माझ्या लक्षात आलं नव्हतं.
   आता आल्ंा ना लक्षात.मग करा त्या हनुमानाचा बंदोबस्त..असं सांगून देवांनी इंद्राचा निरोप घेतला.
   हनुमानाचा बंदोबस्त कसा करायचा याचा प्लान करण्यात इंद्र गढून गेले.
00
रावणाच्या मनात
   रावणाला जेव्हा हनुमानाच्या नव्या पॉवरविषयी कळलं तेव्हा कोणती प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला कळेना.कारण त्याची पॉवर त्याने लंका जाळली,लक्ष्मणाला वाचविण्यासाठी द्रोणागिरी पर्वत आणला तेव्हाच जोखली होती.
   नव्याने पॉवरफूल झालेल्या हनुमानामुळे श्रीरामाची पॉवर कमी होईल की काय,तसे झाले तर उत्तमच.असं रावण मनात म्हणाला,आणि त्यांनी आपल्या बाजूलाच बसलेल्या राजज्योतिषाला हनुमान आणि श्रीरामाच्या कुंडली मांडायला सांगितल.दोघांच्या कुंडल्या अद्यापही पॉवरफूल असून निष्ठेच्या बाबत हनुमानाचा हात सूर्यचंद्र असेतो कुणीही धरु शकणार नाही.त्याच्या ह्रदयातून श्रीराम कधीच जाणार नाही असं ज्योतिषाने रावणाला सांगितलं.मात्र नव्याने पॉवरफूल झालेला हनुमान देवांचा राजाबिजा चुकून बनलाच तर तो आधी यमाला बोलावून तुमची उचलबांगडी नरकातूनही केल्याशिवाय राहणार नाही असही सांगायला ज्योतिषी विसरले नाही.
   मग महाराज, यावर उपाय काय,रावणाने विचारलं.
   111 शनिवार नित्यनेमाने उपवास करा..रामरक्षा म्हणा,हनुमान चालीस पाठ करा.असा सल्ला ज्योतिषांनी रावणाला दिला.या सल्ल्याप्रमाणे वागण्याचे रावणांनी कबूल केले.
000
श्रीराम खुष
   हनुमान नव्याने पॉवर फुल झाल्याचे जेव्हा श्रीरामाला कळले तेव्हा त्यांनी,जे खूप खूप प्रकाशवर्षापूर्वी व्हायला हवे होते ते आता घडले.देर है लेकीन अंधेर नही हे वचन सत्य झाले अशी प्रतिक्रिया दिली.त्यांनी वाल्मिकी,रामदास स्वामी,तुलसीदास,आपले गदिमा आणि रामकथा लिहिणाऱ्या सर्वांचा एक भव्य मेळावा घेतला आणि नव्या पॉवरफूल हनुमानाला साजेसं त्याचं गुणगाण करणार काव्य सुचू द्या असं आवाहन केलं.या आवाहनाप्रमाणे आता नव्या प्रतिभेचे हनुमान काव्य लिहिण्यासाठी लेखन यज्ञ सुरु झालेला आहे.
000
भीमाची चिंता
   हनुमान जर नव्याने पॉवर फूल झाला असेल तर माझी सुध्दा पॉवर वाढायला पाहिजे..नाही का,भीमाने हा प्रश्न कृष्णाला केला.
   कां रे बाबा..असं तुला कां वाटतं.
   देवा मला हनुमानाचा अवतार समजलं जातं ना..
   कुणाला काही समजणं हे महत्वाचं नाही भीमा.कृष्णाने त्याला समजावलं.भक्ती..शक्ती आणि युक्ती या बाबत हनुमान केवळ तुझ्याच नव्हे आम्हा देवांच्याही शेकडो मैल दूर गेलाय.
   म्हणजे मी आहे तसाच राहणार का..
   राहा की..खाओ पिओ और बकासूरको लुढकावो..श्रीकृष्णाने प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रियेवर सर्व पांडव मंडळी खो खो हसायला लागली.
   असं असलं तरी भीमा,समजा,पुन्हा एकदा चुकून जर महाभारत युध्द झालच तर या नव्या पॉवरफुल हनुमानाला आपण आपल्या बाजूने आणू..याची आत्ताच मी तुला खात्री देतो.तू म्हणत असशील तर मी श्रीरामाकडे त्यासाठी शब्दही टाकून ठेवतो..श्रीकृष्ण उद्गारले.या उद्गारांंनी भीमासह सर्व पांडवाचं समाधान झाले.
000
सूर्याची चिंता आणि चिंतन
   हनुमान बालक असताना आपल्याला गिळायला निघाला होता.आता त्याच्याकडे नवा पॉवर आल्यावर तर आपलं काहीच खरं नाही अशी भीती सूर्याला वाटली.हनुमान बालक असताना आपणही तरुण होतो.आपल्या अंतरंगात हायड्रोजनचा प्रचंड मोठा साठा होता.त्यामुळे आपली धग अतिप्रचंड होती.तरी सुध्दा त्याने आपल्याला गिळण्याचा प्रयतन केला.पण इतक्या हजारो वर्षात आपल्या अंतरंगात होणाऱ्या हायड्रोजन स्फोटांमुळे हा साठा आता खूप खूप कमी झालाय.त्यामुळे आपली धग सुध्दा कमी झालीय.एकिकडे आपली पॉवर कमी झालीय दुसरीकडे मात्र हनुमानाची पॉवर वाढलीय.बालपणासारखी हनुमानाची वक्र दृष्टी आपल्याकडे वळली नि तो आपल्याला गिळायला निघाला तर तर आपलं काहीच खरं नाही.अशी चिंता सूर्याला वाटू लागली.ही चिंता त्याने चंद्राला शेअर केली.
   चंद्र म्हणाला,डोण्ट वरी मी आहे ना..
   पण तू काय करणार..
   समजा हनुमानाने तुझ्याकडे वक्र दृष्टी वळवलीच तर मी हिलरी क्लिंटनला तुझ्या समोर उभी करीन ना.
   कोण या देवी.
   या देवींनी ओबामांच्या नाकी दम आणला होता.
   नव्या युगाच्या पॉवरफुल देवी दिसतात या.भवानी मातेच्या की लक्ष्मी मातेच्या अवतार आहेत त्या.
   ते अद्याप कुणाला कळलं नाही.पण त्यांनी आंेबामंाना फेस आणलाच होता.
   पण हे ओबामा देव कोण आहेत.
   सूर्य देवा,अरे या ओबामंामुळेच हनुमानाची हजारो मेगॅवॅट असलेल्या पॉवर मध्ये वृध्दी झाल्याचं सध्या पृथ्वीतलावर चर्चा आहे..
   पण हिलरी देवी हनुमानाला माझ्याकडे येण्यापासून कशा काय थोपवू शकतील.
   हनुमानाकडे शिष्टाई करण्यासाठी त्यांना ओबामांकडे पाठवणाची जबाबदारी माझी. डोण्ट वरी.
   तुझी जानपहेचान आहे का ओबामांबरोबर.
   नाही सूर्यदेवा..माझाएक भक्त आहे.तो असली काम करण्यात तरबेज आहे..त्याला मी सांगेन ना..
   कोण तो..
   चंद्रास्वामी..चंद्र उद्गारला आणि सूर्याने सुटकेचा श्वास घेतला.
000
भाईलोग कहते है
   हनुमानाची पॉवर आणखी वाढल्याची खबर स्वर्गाला लागूनच असलेल्या नरकातही पोहचली होतीच.भाय मंडळी सकाळी सकाळी फिरायला जातांना यावरच चर्चा करत होते.
   एक भाय म्हणाला,यार ये हनुमान वनुमान इतना पॉवरबाज होयंगा ये अपुनके ध्यानमेच नयी आया.
   आता तो क्या करता रे तू भाय..
   भाय,अपून साला हरसाल गणपती बाप्पा उत्सव कितनी धुमधामसे करता था ना मुंबईमे.मेरा बाप्पा तो मेरे इलाके का राजा था..
   तो क्या हुवा..
   अरे भाय,अपन लोगो कब्बी भी हनुमान का उत्सव नयी मनाया.उसका भी मूर्ती बिठाने को मंगता था ना.दस बारा दिन.
   मेरे दिगाम कुछ नही रहा है.
   अरे भाय ,अभी ये हनुमान पॉवरफुल बनेला है..
   वो पहले से पॉवर फूल है..
   वो इंडिया मे था..
   अब कहा हौ गया..
   अमरिका मे..
   तो..
   तो तो ,भाय आप जरा दिमाग की घंटी बजावो..
   बजायी..
   कुछ समझ मे आया का..
   नही..
   गंज गयी है..
   तो तू बोलना. कायकू टाईम खायला है मेरा..
   भाय,अपून लोगोने गणपती बाप्पा जैसी हनुमान उत्सव मनाया रहता तो ओबामा के अमरिका में भी अपून लोगोके घुसने चान्स था.
   यानेकी मुंबई की भायगिरी न्यूयॉर्कमे.
   अब बज गयी ना घंटी दिमाग मे..
   घंटा  बजा..
   बोले तो..
   ओबामा के राज मे अपनेकोच पहले वहँा हनुमान उत्सव का चान्स मिलता और फिरक्या  दिमाग की घंटी ,घंटा बन जाती.पुरा अमरिका अपने जेब मे..
   लेकीन अब क्या..
   क्या करंेगे भाय..
   अब एखादा नया  भाय निचे टपकने बाद इधर आयेंगा तो उसके मोबाईल से नये जवान भाई लोगोंको इस साल से 10 दिनका हनुमान उत्सव मनानेकी आयडिया दे देते है ..अपुनको कुछ फायदा नही हुवा लेकिन अब नये भाई तो बिझिनेस अमरिकामे कर सकते है ना..
   वा भाय मान गये तुमको..
000
   एसएचझेड
   बराक ओबामा राष्टपती झाल्यास हनुमानाची पॉवर वाढण्याची शक्यता दिसताच चीन सरकारच्या सर्वोच्च स्तरावर विषेश बैठकीचे आयोजन केलं गेलं.चीनच्या आर्थिक समृध्दतेत वाढ करण्याची शक्यता या संभाव्य घटनेमध्ये असल्याचे पॉलिटब्युरोच्या एका महत्वाच्या सदस्याने वर्तवली.या संधीचं सोन्यात कसं रुपांतर करता येईल याचा कृती आराखडाच त्याने बैठकित ठेवला.त्याच्या या कृती आराखड्यानुसार विनाविलंब एसएचझेड म्हणजे स्पेशल हनुमान झोन स्थापन्याचा निर्णय झाला.
   शांघाय नजिक यासाठी जागा सुध्दा फिक्स करण्यात आली(कारण हिंदुस्थान्यांना या शांघायच फार आकर्षण असल्याने ते शांघायजवळच्या स्पेशल हनुमान झोनसाठी भक्तिभावाने धाव घेतील.असा सिध्दांत शांघाय जवळच एसएचझेड स्थापन्यामागे असल्याचे कृती आराखडयात नमूद केले होते.)चीन मध्ये एकदा कृती आराखडा बनला की मग फार चर्चा होता थेट कामालाच सुरुवात केली जाते.त्यामुळे एसएचझेड स्थापन्याचा कृती आराखडा मान्य होताच अरुणाचल प्रदेशातील एका पंडिताकडून शुभमुहुर्तावर या एसएचझेडचा नारळ फोडण्यात आला.
   या एसएचझेड मध्ये हनुमानाशी निगडीत जगातील आणि भारतातील सर्व भाषातील पोथ्या,पुस्तके,धार्मिक ग्रंथ यांच्या अब्जावधी प्रती काढणारी यंत्रणा,या हनुमान साहित्याला जगातील सर्व भाषांमध्ये भांषातरीत करण्याची यंत्रणा,हनुमानाच्या मूर्ती तयार करणारा विभाग,हनुमान टी शर्ट,हनुमान की चैन,हनुमान कॅप,हनुमान कँडल लँप, हनुमान टॉईज,हनुमान एनिमेशन,हनुमान मूर्ती सोबतच रेडिमेड हनुमान मंदिर,हनुमान डीव्हीडी,हनुमान रेकॉर्डस,हनुमान रिंगटोन,जगातील सर्व हनुमान मंदिराची डीव्हीडी यांच्या निर्मितीचा मल्टीमिडीया उद्योग उभारले जाणार होते.हे उद्योग उभारण्यासाठी जे कोणी समोर येतील त्यांना सर्व प्रकारच्या सोई-सवलती देण्याची घोषणा झाली.
   एसएचझेडमध्ये उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्यां उद्योजकांचे सर्व प्रश्न आणि समस्यां सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्यासाठी आयएसएसची नोकरी सोडलेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.त्याला भारतीय चलनात पगार देण्याचाही निर्णय झाला.
   हनुमान विषयावर आधारित एक थिम पार्क या एसएचझेडमध्ये सुध्दा उभारण्यावर शिक्कामोर्तब झाला.थिम पार्क उभारण्यात तज्ज्ञ असलेल्या डिस्ने लँड कंपनीला ऑफर देण्यात आली.
   या निर्णयासोबतच असाही निर्णय घेण्यात आला की जगात ज्या ज्या ठिकाणी हनुमानाचे मंदिर असतील त्या सर्व स्थंानाचा जिर्णाेध्दार करण्यासाठी हनुमान टेम्पल जिर्णाेध्दार फंड निर्माण करायचा.त्याद्वारे हे काम कालबध्दरित्या पूर्ण करायचे.या सर्व मंदिरांना जोडणारा स्पेशल कॉरीडार तयार करायचा.या महामार्गावरुन स्पेशल बुलेट ट्रेन सुरु करायची.शिवाय हनुमान एअर लाईन्स सुरु करुन भारतातील आणि जगात इतर ठिकाणी राहणाऱ्या अनिवासी भारतीय भाविकांना सवलतीच्या दरात या मंदिर स्थानकांच्या यात्रेची सोय करुन द्यायची.त्यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांना सवलती द्यायचा.अनेक क्षेत्रात झाली नसली तरी चिनी हिंदी भाय भाय ही संकल्पना मूर्त स्वरुपात या  बाबतीत साकार करायची.
   000
   राज की बात?
   असंख्य हॉरर पट आणि गँगवार पट काढून काढून थकलेल्या राम गोपाल वर्माच्या कानावर बराक ओबामांच्या हनुमानभक्तीची चर्चा जाताच त्याच्या प्रतिभेला नवे पंख फुटले.या पंखाच्या सहाय्याने तो कल्पनेच्या राज्यात उंच उंच उडू लागला.त्याचा आलेला थकवा दूर झाला.आता आपण आपल्या क्रिएटिव्ह अँगलने हनुमानाची कथा पडद्यावर रंगवू .आपला हनुमान सगळयांपेक्षा वेगळा राहील.इट विल बी डिफरंट.राम गोपाल वर्मात स्वत:लाच म्हणाला.हनुमानावरचा चित्रपट कसा राहील याचा विचार करण्यासाठी त्याने डोळे मिटले.त्याचे विचारचक्र जोरात सुरु झाले.त्याला या चित्रपटाचे नाव हनुमान राज असे सुचलेही.हा चित्रपट सरकार राजचा पुढचा भाग राहील का.. कुणीतरी रामगोपाल वर्माच्या कानात बोलले.राम गोपाल वर्मा ताडकन कोचावरुन उठला आणि इकडे तिकडे बघू लागला.पण अवती भवती कुणीही नव्हते.भूत तर आले नाही ना.वर्मा स्वत:लाच म्हणाला.पण ते तर माझ्या सिनेमातच असतात.ते कशाला इथे येतील.उर्मिला(मांतोडकर)ची तर ही शरारत नाही ना..त्याने स्वत:ला प्रश्न केला.आजूबाजूला कोणीही नाही हे बघून त्याने सुटकेचा नि:श्वास झाला.तो पुन्हा कोचावर बसला.पुन्हा हनुमान चित्रपटाच्या विचारात गुंग झाला.हनुमान राज हा सरकार राजचा तर पुढचा भाग राहणार नाही ना,पुन्हा कुणी तरी वर्माच्या कानाजवळ बोललं आणि तो ताडकन उभा राहिला.त्याने पुन्हा एकदा इकडे तिकडे बघितले पण तिथे कुणीही नव्हतं.बाळासाहेबांनी पाठवलेला सैनिक तर नसेल ना..एक शंका वर्माच्या मनात आली.पण कुणीच दिसत नव्हतं.भूत नाही..सैनिक नाही.मग आहे तरी कोण इथं,कौन अज्ञात भाई है यहाँ.राम गोपाल वर्मा जोरात ओरडला.त्याला आता दरदरुन घाम फुटला.
   गुंडगिरीवर सिनेमावर सिनेमे काढणारा तू एवढा घाबरट कसा रे आहेस..दिवाणखान्यात आवाज घुमला.
   ....कोण आहे..समोर कां येत नाहीस.चळचळा कापत रामगोपाल वर्मा म्हणाला.
   मी येईन ना समोर ..पण तू मला एक आश्वासन दे
   का काय.वर्मा कसाबसा म्हणाला.
   तू हनुमानावर फिल्म बनवणार नाहीस ते.
   का कांपण..और यह सांगणारा तू कोण आहेस..
   तू बनवलेली आग कशी फुस्स निघाली हे विसरलास का तू
   त्याचा काय संबंध हनुमानजींच्या फिल्मसोबत.
   आगीचा संबंध आहे वर्मा..हनुमान लंकेला आग लावतो.त्यामुळे पुढचं रामायण घडतं.
   मग..
   अरे तू तुझ्या सिनेमात रावणाने लंकेला आग लावली आणि हनुमानावर आरोप ठेवला असं उलटं दाखवशील..क्रियेटिव्ह स्वातंत्र्य घ्यायला तुला  फार आवडतं.
   माझी मर्जी..
   म्हणूनच म्हणतो तू हनुमानावर फिल्म बनवू नको..
   पण हे सांगणारा तू कोण..वर्मा कसा बसा म्हणाला.
   मी हनुमान..दिवाणखान्यात आवाज घुमला.
   असल्या धमक्यांना मी घाबरत नाही.
   धमकी नाही..तू जर हनुमानावर सिनेमा बनवलास तुला अभगानिस्तानात नेऊन ठेवीन याद राख.दिवाणखान्यात आवाज घुमला.
   राम गोपाल वर्मा त्या आवाजाकडे बघतच राहिला.
   00



No comments:

Post a Comment