Friday, March 9, 2012

फुक्क्ट गेली जिंदगी. . .

फुक्क्ट गेली जिंदगी. . .
    परवाची गोष्ट सकाळी नाश्ताच्या टेबलवर बसल्या बसल्या श्री धमेंद्र देवल यांच्या वर सौ.हेमामालिनी बरसल्या.
    "फुकट गेला तुमचा जन्म."असं त्या धमेंद्र यांच्या ग्लासात महानंदांच दुध ओतता ओतता म्हणाल्या.त्यावेळी सरसोका साग पित असलेल्या धर्मेद्र यांना जोरदार ठसका बसला.त्यांनी हेमामालीन यांच्या कडे जरा डोळे वटावरुन बघितलं.
    "असं बघण्याचे दिवस राहिले नाहित आपले धमेंद्रजी." हेमामालिनी पुन्हा बोलल्या.
    "माझा जन्म फुकट गेला असं माझे दुश्मनपण म्हणणार नाहीत.तुम्ही तर आमच्या राणी.कही लंबूने तो तुम्हे बहकाया नही..पिछले कुछ सालोम उसकेही साथ सिनेमा कर रही हो ना.."धमेंद्र जरा चढया आवाजात म्हणाले.
    "कुणी बहकविण्यासाठी मी आता काही 16 साल की छोरी नाही राहिली मिस्टर."हेमामालिनी किंचित चिडून म्हणाल्या
    "मग,माझी जिंदगी फुक्कट गेली याचा अर्थ तरी समजावून सांग.मी पंजाब दा गाव कां छोरा,मुंबईत आलो.ही मॅन झालो.स्टार झालो.तुमच्या सारख्या ड्रीमगर्लला माझी ड्रीम वूमन बनवलं.खासदार झालो और जिंदगी मे क्या चाहिए.
    "तरी मी म्हणेन तुमचं जीवन फुक्कट गेलं."हेमामालीनी जरा थोडया चढया आवाजात म्हणाल्या.
    "कसं फुकट गेलं हे अजुनही तुम्ही सांगतच नाही."महानंदाचं दूध तोंडाला लावत धमेंद्र म्हणाले.
    "सांगते .जरा लक्षपूर्वक ऐका."
    "बोला."
    "प्रिंस चार्लसच्या मोठ्या मुलांच वर्षभरापूर्वी लग्न झाल. ."
    " माझी जिंदगी फुकट जाण्याशी त्याचा काय संबध."
    "आहे ना.तुम्हाला चार्ल्सने लग्नाचं निमंत्रण दिलं का?"
    "मला कां म्हणून देईल.तो काही माझा साळा नाही."
    "म्हणूनच म्हणते तुमचा जन्म फुक्कट गेला."
    "अरे फिर वही घिसीपिटी बात.."
    "घिसीपिटी नही जनाब..तुम्ही स्वत:ला स्टार म्हणवता,हीमॅन म्हणवता.पण चार्ल्सने तुम्हाला लग्नाला बोलावलं नाही.मंुबईतल्या डब्यावाल्यांना मात्र आवर्जून निमंत्रण पाठवलं.त्यांच्या तिकिटाची व्यवस्था केली.लंडनमध्ये खास -हाडी म्हणून  ते मिरवले . तुम्ही बसले इकडे सरसो का साग आणि महानंदाचं दूध पित."
    "हे बघ हेमा,प्रिंस चार्ल्सने कुणाला लग्नाला बोलवायचं नि कुणाला नाही हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.धर्मेद्र काय चिज,है हे त्याला कदाचित माहितच नसेल."
    "म्हणूनच तर म्हणते ना तुमची जिंदगी फुक्कट गेली.अहो तुम्ही डब्बेवाले असतात तर त्याने तुम्हाला नसतं कां निमंत्रण दिलं."
    "मी डब्बेवाला झालो नाही म्हणून माझी जिंदगी फुक्कट गेली असं तुला म्हणायच तर..
    "अभी भी आपके समझ मे बात नही आयी.."
    "म्हणजे काय?"धमेंद्र डोकं खाजवत म्हणाले.
    "तुम्ही डब्बेवाला असता तर प्रिन्स चार्लसच निमंत्रण आलं असतं.तुम्ही लंडनला गेला असतात तर किती फायदा झाला असता."
    "कोणता."धर्मेद्र यांनी  आश्चर्याने विचारलं.
    "प्रिसं चालर्सच्या मोठ्या मुलाच्या लग्नातच आपल्या पोरींच्या लग्नाची बोलणी नसती करता का आली तुम्हाला.मोठा तर गेला हातून आता.पण लहाना अजून आहे, उपवर.आपल्या इशासाठी त्याचा हात मागता आला असता . राजमाता आणि प्रिन्स चार्ल्स  लहान्या राजकुमारासाठी सुयोग्य,सुशील,देखण्या घरंदाज वधु शोधताहेत.प्रिंस चार्लस फक्त कामिला पार्कर आणि डब्बेवाला यांच्यावर फिदा आहेत.तुम्ही डब्बेवाला असता तर आपल्या इशासाठी लहान्या राजकुमाराचा हात मागू शकला असता.डब्बेवाल्याची सुकन्या वधू म्हणून स्वीकारुन चार्ल्स यांनी डब्बेवाल्यांशी आपले  ऋणाणूबंध आणखी घटट केले असते.डब्बेवाल्यांचा व्याही म्हणून मिरवायला त्याला आवडलं असतं.इशा धमेंद्र देवल ,प्रिसेंस इशा झाली असती..पण काय झालं बघा,परवा बांद्र्याच्या पोराच्या गळयात तिला वरमाला टाकावी लागली."असं बोलून हेमामालीनी यांनी दीर्घ उसासा टाकला.
    आपली ड्रीम वूमन इतका दूरचा,साता समुद्रापलिकडचा-थेम्स नदीपर्यंतच्या अंतराचा विचार करु शकते हे बघून धमेंेद्र अवाक झाले.आपल्या विचाराची झेप मिठी नदीपर्यंतही जात नाही  असं ते मनातल्या मनात पुटपुटले.
   डब्बेवाला बनूण आपली जिंदगी खरोखरच फुक्क्ट गेली ,असं त्यांना वाटू वागलं.

No comments:

Post a Comment