Sunday, March 18, 2012

माणूस आणि उंदिर


माणूस आणि उंदिर
    माणूस आणि उंदिर यांच्या जिन्स मध्ये सर्वाधिक साम्य आढळून आल्याचा शोध नुकताच इंग्लड मधील शास्त्रज्ञांना लागला.त्यामुळे माझ्या बायकोला सर्वाधिक आनंद
झाला.ती आनंदाने नाचली असती.पण तिच्या नाचण्याचे मला काहीच कौतुक नसल्याची तिची समजूत असल्याने नाचता येईना पण 250 चोैरस फुटाच्या फ्लॅट मधील ड्रॅाइंर्गरुम वाकडी असं तिला वाटत असल्याने ती काही नाचली नाही.माझी समजूत तिला मी सांगू शकत नाही कारण ते मांजरीच्या गळयात घंटा बांधण्यासारखं आहे.आपली तर बुवा अशी हिंमत नाही.(एकदाचं सिंहांच्या गळयात बांधणं जमेलसे पण मांजरिच्या गळ्यात नो वे..)
    तर मुद्दा तिला आनंद होण्याचा होता.कारण तिची म्हणे पूर्वापार अशी समजूत होती की मानसाचा पूर्वज हा उंदिरच.अशी तिची समजूत असण्याचं किंवा होण्याचं कारण म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या घराण्याचं कुलदैवत कुणी उंदिरोबा नावाचे महापुरुष.ते उंदरासारखे दिसत नव्हते.तर प्रत्यक्ष उंदिरच होते.ते चार पायांनी तुरुतुरु चालायचे.मनात आले तर धावायचे.तसे ते काहीच खात नसत.तर कुरतडत असत.पण सर्वांचच नाही.-या भक्तालाच हा मान मिळायचा.हा मान म्हणजे त्या भक्तासाठी आशीर्वाद असायचा.ते कुरतडेलेले जे काही असेल ते मोठया भक्तिभावाने खाल्लं जायचं.हेच उंदिरोबा महाराज पुढे श्री गणेशाचे वाहन झाले.तशी त्यांची शेवटची इच्छा होती.ही इच्छा पूर्ण झाली नसती तर जगात प्रलय आला असता.तो टाळण्यासाठी श्री गणेशाला उंदिरोबा महाराजाला आपलं वाहन करावं लागलं.(अशी ही कथा किंवा दंतकथा अनेकदा आमच्या सौ ने आम्हाला ऐकवली आहे.)
    आमच्या बायकोचं यातल इंटरप्रिटेशन असं की ही दंतकथा असली तरी त्यातील बिटवीन लाईन अर्थ आपण बघायला हवा.तिच्या मध्ये हा अर्थ असा होताक की- उंदिरोबा महाराजांची हुषारी ,दूरदृष्टी आणि भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता हे सारं कही या दंतकथेतून स्वच्छपणे दिसून येतं. उंदिरोबा महाराजांना आपल्या साधनेनं कळलं होतं की पुढे एकोणिसाव्या शतकापासून सर्व देवंडळींचं माहत्म्य लोप पावून श्री गणेशच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसतील.ते एव्हढे लोकप्रिय होतील की 20 व्या शतकातील ग्रेट-थ्रेट वरदराजन मुदलियार,छोटा राजन या सारख्या दादा मंडळिंना सुध्दा त्यांचा उत्सव साजरा करण्याचा मोह आवरणार नाही.त्यामुळे श्री गणेशाशी जर संबध जोडला तर  उंदिरोबांचे सुध्दा महत्व पुढे किमान दहा-हजार वर्ष तरी कायम राहणार.एका विशिष्ट घराण्यापुरतं कुलदैवताची भूमिका बजणा-या उंदिरोबा महाराजांचे पूजन समस्त जनता करु लागेल.जिथे श्री गणेश असतील तिथे उंदिरोबा असतील.काही ठिकाणी त्यांचेही स्वतंत्र मंदिर बांधले जातील.उंदिरोबाशिवाय गणेश अपूर्ण राहतील..माझ्या बायकोचे हे विश्लेषण तर्कदुष्ट होते.मात्र त्यातून उंदिरोबा महाराजांची दूरदृष्टी खरी ठरल्याचे दिसून येत होते.
    "पण यातून उंदिर आणि माणसातल्या जिन्स मध्ये साम्य कसे दिसून येतं'मी बायकोला विचारले.
    'हुषार माणसं अशीच वागतात.आता बघा भविष्य काळात बराक ओबामा यांचं महत्व आणि माहात्म्य वाढणार हे दूरदृष्टीने लक्षात घेउुन त्यांच्याजवळ जी माणसं जातील किंवा गेली आहेत किंवा जाण्यासाठी उंदिर दौड करतील त्यांचा फायदाच होणार की नाही'..
    "तुझं विश्लेषण अगदी करेक्ट आहे.'मी म्हणालो.
    "उंदिर आणि माणसाच्या जिन्स मध्ये साम्य असल्यानेच अशी हुषारी दाखविण्यात या दोघांमध्ये साम्य दिसून येतं.'
    "खरचं की,हे सालं माझ्या लक्षात आलच नव्हतं.'
    "शिवाय माणूस आणि उंदिराच्या जिन्स मध्ये साम्य असण्याचा महत्वाचा पुरावा म्हणजे दोघांची कुरतडण्याची शक्ती.'
    "ती कशी..'
    "या दोघांच्या कुरतडण्यातलं साम्य थक्क करणारं आहे.उंदराच्या कुरतडण्याच्या शक्तीचा प्रत्यय सा-या जगाला आलाच आहे.पण माणूस तर त्यापासून तसूभरही कमी नाही.'
    "तो कसा..'
    "आता हेच बघाना.माणसाने काय नाही कुरतडायचं ठेवलय.संधी मिळाली की कुरतडतो.आणि कुरतडायची संधी निर्माण करतो.मृत सैनिकांसाठी असलेल्या शवपेटिला कुरतडायची त्याला कल्पना सुचते आणि तो बिनधास्त तशी हिमंत दाखवतो.गुराढोरांसाठी असलेला चा-यात कुरतडण्याची संधी त्याने शोधली. कुरतडून तुकडे पाडण्याच्या माणूस आणि उंदराच्या शक्तीतलं साम्य थक्क करणारं नाही का..'
    "करेक्ट..'
    "आता तुमचच बघाना...'
    "काय..'
    "दररोज तुम्ही माझं डोक कुरतडताना..'
    "काय म्हणालीस..'
    "म्हणून सगळया बायकांना त्यांचे नवरे हे उंदिर वाटतात..समजलं. असं असलं तरी महाराज,तुम्हीच आमचे परमेश्वर की नाही..हा खरा बिटवीन लाईन अर्थ.'बायको मिस्किलपणे हसत म्हणाली..
000

No comments:

Post a Comment