Saturday, January 21, 2012

इसका राज क्या है?

     
                                                            
इसका राज क्या है?
      सलमान रश्दी हे महान लेखक आहेत किंवा नाहीत  यावर गेल्या 25 वर्षात बरीच चर्चा होत आली आहेत.ते थोर व्यक्तिमत्व आहेत की नाही याबाबत जगभरात बरीच मतभिन्नता आहे.ते मुंबईकर आहेत असं कधी कधी त्यांच्याबद्दल लिहून येतं.ते कां येतं याचा शोध अद्यापही कुणी घेतला नाही तसेच त्यावर ओरिजनल आणि डुप्लिकेट मुंबईकर यंानी कधीच आक्षेप घेतलेला नाही.ही बाब विशेषत्वानं नमूद करण्यासारखी आहे.
      ते काही महिने लंडन मध्ये राहतात.उर्वरित काळ कुठे राहतात हे फक्त त्यांनाच ठाऊक असतं.सध्या ते ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेले भारतीय सॉरी इंडियन आहेत.असं इंडियातील सर्व इंडियन्सना वाटतं. सलमान यांना मात्र त्यांना ते ग्लोबल सिटीजन आहेत असं वाटतं.याचा अर्थ काय हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.तशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं बरोबर नाही. कारण अर्थ सांगण्याच्या भानगडित ते पडत नाहीत.ही भानगड समिक्षकांनी करावी,आपल्याकडे तेव्हढा वेळ नाही असं ते म्हणत असतात.
      त्यांच्या काही शब्दांनी काही काळापूर्वी अनर्थ निर्माण झाला होता.त्या अनर्थातून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली.पण लंडन मध्ये त्यांना सुरक्षित कवच मिळाले.पुढे ब्रिटनच्या राणिने त्यांना नाईटहूड वगैरे दर्जाची पदवी दिली.त्यामुळे ब्रिटनमधील इंडियन्स लेखकांना आणि इंडियातील इंडियन्स लेखकांना पोटशूळ उठला.त्यानंतर सलमान रश्दी हा खरोखरच लेखक आहे का,त्याच्या साहित्याचा दर्जा काय,त्याच्या क्रिएटीव्हीटीची स्केल काय,तो फक्त पुराणतल्या कथा तिखट मीठ लावून आणि अतिरिकत लसून आणि आलं टाकून नव्याने सांगतो,तो आपली प्रसिध्दी पध्दतशीर करतो,वगैरे वगैरे बरीच टीका टिपारणी झाली.सलमान रश्दी यांना वाटलं तेव्हा त्यांनी याचं उत्तर दिलं.त्यांना सोईचं असेल तेव्हा तेव्हा गप्प बसले.
हा शांततेचा काळ त्यांनी सत्कर्मी लावला.या काळात त्यांनी दुस-या किंवा तिस-या बायकोला कायदेशिर तलाक दिला.आणि पद्मा लक्ष्मी नावाचा लंडनवासीय इंडियन बाईशी सूत खरं तर दोरा जुळवला.काही जण छद्मीपणे म्हणाले पद्मीच सलमानच्या गळयात पडली.मात्र एक गोष्ट खरी की भारतातल्या सलमान(खान)ला जे शक्य होऊ शकलं नाही ते बिटनच्या या सलमानांनी शक्य करुन दाखवलं आणि तो पद्मा सोबत बोहल्यावर चढला.
      या दोघांचा जोडा मुकरी आणि एैश्वर्यारायसारखा वाटला.पण युध्दात ,प्रेमात आणि लग्नात सारं काही चालतं आणि माफ असतं असं शोभा डे यांनी या घटनेवर लिहिलं.
      असे हे सलमान रश्दी लेखक म्हणून ग्रेटेस्ट असतील नसतील कदाचित ते शेक्सपियरच्या तोडिचे असतील ,नसतील.होमरलाही ते मात देत असतील किंवा नसतील ,पण त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी काय बुवा जादू आहे की सुंदर सुंदर ललना त्यांच्या प्रेमात पडाव्या किंवा त्यांना त्या ललनांना प्रेमात पाडणं शक्य व्हावं.हा प्रश्न स्वत:च्या आणि असंख्य महिलांच्या प्रेमात ,वयाच्या 90 पर्यंत आकंठ बुडालेल्या खुशवंतसिंगांनाही पडला.
      त्यांना असं वाटतं की हा सलम्या,दिसायला बुटका,डोक्यावर टक्कल पडलेला.दाढीचं खुंट बाहेर आलेला.पोटाचा घेर वाढलेला.दात बाहेर आलेला ,कसा काय पोरींसाठी आकर्षणाचा बिंदू ठरु शकतो.कुछ तो राज है इसका.
      परवाच खुषवंतसिंगांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या विषयावर त्याची स्तुती केली.कदाचित काही जणांना ती खिल्लीही वाटू शकेल.ते म्हणतात की,सलमान उत्तम लेखकच आहेच यात शंकाच नाही.त्याच्या काही कादंबऱ्या मस्तच आहेत.काही फालतू आहेत.पण त्याच्यावर सरस्वती प्रसन्न आहे.पण त्याच्याकडे यापेक्षा नक्कीच काहीतरी अधिकच आहे.त्यामुळेच त्याच्या शय्येची उर्जा वाढविण्यासाठी सतत सुंदर संुदर ललना त्याला स्वखुषिने भेटतात.क्या है इसका राज?
      खुशवंतसिंगच असं थेट विचारु शकतात.त्याच कारण असं घडलं की,पद्मा आता सलमानांच्या सौभाग्यवती नाहीत.त्यांच्या सोबत प्रेमाच्या कवितेच्या आस्वाद घेतल्यावर आणि संपूर्ण समीक्षा वगैरे साहित्यिक उपक्रम पार पाडल्यावर पज्ञ्मा सलमानांच्या कादंबरीतून बाहेर पडल्या.त्यांनी नव्या नॉव्हेलच्या दिशेने मोर्चा वळवला.पद्मा नावाची कविता आणि हा अनामिक नॉव्हेल यांचं पुढे संगम झालं त्यातून सॉनेट(सुनित)काव्य प्रसवलं सुध्दा..पद्माच्या नॉव्हेलचं नाव-गाव अद्याप गुलदस्त्यात आहे.हा भाग वेगळा.पण पद्माताई इतरांच्या साहित्य-सहवासात गेल्यावर सलमान खचले नाहीत..रडले नाहीत. (या बाबतीत आपला सलमान खान जरा बावळटच निघाला.कारण एैश्वर्याने त्याच्याकडे कानाडोळा केल्यावर त्याच्या डोळयातून अश्रूचे पाट वाहिले होते.त्या पाटांमुळेच त्याला पुढे हातात ब्रश घ्यावा वाटला आणि तो चित्र काढत बसला..पुढे तो प्रेमात वैगेरे पडला.पण त्या प्रेमात पॅशन दिसलं नाही..या सलमानने ब्रिटनच्या सलमान गुरुजींची याबाबत दीक्षा घ्यायला हवी.)उसासे टाकले नाहीत.दारु पिऊन गोंधळ केला नाही.दु:खाच्या कविताही केल्या नाहीत.उसासे टाकत कादंबरीही लिहिली नाही.तर त्यांनी युध्दस्तरावर प्रेमात पडण्यासाठी सर्वप्रकारच्या हालचाली केल्या.त्यात यशस्वीही झाले.कोणतीतरी ब्रिटीश मॉडेल ही आता त्यांची आर्मकँडी म्हणजे त्यांची शोभा वाढविणारी आणि सोबत करणारी अर्थातच सर्व प्रकारची.हा संदर्भ खुषवंत सिंगांनी पकडला आणि ते इसका राज क्या है असे विचारते झाले..
0000
      काय असेल इसका राज..याची दहा कारणे खालील प्रमाणे राहू शकतील..
1)सलमान यांना वात्सायनाच्या कामसूत्र ग्रंथातील सर्व काव्य मुखपाठ असावेत.
2)ते कामसूत्र ग्रंथाचे टीका-स्वयंवर म्हणजेच समीक्षा सर्वोत्कृष्ठ करु शकत असतील.
3)त्यांनी कामसूत्र ग्रंथातील काव्याचा सुक्ष्म अभ्यास केला असल्याने त्यांना या काव्यामध्ये दडलेली गुपिते कळली असली पाहिजेत.या गुपितांचा प्रभाव रोमान्स करताना पडून त्यांची प्रेमपात्र धन्य धन्य म्हणत असतील.
 4)त्यांनी कामसूत्राची अत्याधुनिक आवृत्ती तयार केली असली पाहिजे.
5)खजूराहो आणि कामसूत्रांचा अनन्यसाधारण संबध आणि संपर्क याचे विश्लेषण करणे त्यांना शक्य झाले असेल.
6)कामसूत्र ते शिल्पसूत्र असा वात्सायन मुनिंचा झालेला प्रवास सलमान यांना आपल्या महालवजा फ्लॅटमध्ये घडविणे शक्य होत असेल.
7)कदाचित तेच वात्सायन मुनिंच्या कुळातील 22शेवे वारस असल्याचे त्यांना पुरावे मिळाले असतील.(हे शक्य होऊ शकतं कारण ते प्राचीन काळातील साहित्याचं सतत संशोधन करत असतात नि त्यातूनच त्यांना लेखनाची प्रेरणा मिळत असते.)
8)त्यांच्यातील सृजनरुपी समुद्रात आपण यथेच्छ आंघोळ केल्यास वा न्हाउुन निघाल्यास आपल्याही वाण नाही पण गुण लागेल असं ललनांना वाटत असावं.
9)ते व्हायग्रा प्रमोशनचे ब्रँड ऍ़म्बेरसेडर तर नाहीत ना?
10)मिस्टर ह्यूज हेफनेर. वय वर्षे 84.जगातील तमाम पुरुषमंडळीचे महालाडक्या प्लेबॉय मासिकाचे मालक संपादक आणि नुकतेच 24 वर्षात सुंदरीसोबत साखरपुडा केलेले क्रांतीवीर पुरुष.त्यांना खिजविण्यासाठी तर सलमान हा असा पराक्रम गाजवत नसावेत ना..
0000
      या दहा कारणांपैकी कोणते कारण खरे असेल?याचा कधी शोध लागेल का?असा प्रश्न मला पडला आणि आपण फक्त प्रश्नच पाडू शकतो .त्याच्या पलिकडे आपलं काही जात नाही..एवढा सलमानचा आदर्श असताना सुध्दा..इकडच्या आणि तिकडच्या सुध्दा..थूत तुझ्या जिंदगानिवर..असं कुणीतरी म्हणालं नि मी भानावर आलो..मीच मला म्हणतो...हे लक्षात येताच मी डोळे मिटले..नि रामदेवबांबाचा धावा करु लागलो.
000  

     





No comments:

Post a Comment